...म्हणून मी भाजपात प्रवेश केला; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 01:32 PM2019-07-31T13:32:08+5:302019-07-31T13:32:28+5:30

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज जाहीररीत्या भाजपात प्रवेश केला आहे.

Chitra Wagh's entering bjp | ...म्हणून मी भाजपात प्रवेश केला; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

...म्हणून मी भाजपात प्रवेश केला; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

googlenewsNext

मुंबईः राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज जाहीररीत्या भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी एका वृत्तावाहिनीलाही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार झाला, त्या त्या ठिकाणी मी आवाज उठवला, मी सरकारविरोधात अनेक आंदोलनं आणि मोर्चे काढले.

माझ्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. भाजपा सत्ताधारी पक्ष आहे म्हणूनच मी भाजपामध्ये आले आहे. लोकांची भूमिका मांडण्याऐवजी आता त्या सोडवून दाखवेन. मी कुठेही पळून गेलेले नाही. मी गद्दार नाही, राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी पक्ष सोडला. पतीच्या चौकशीचा आणि भाजपा प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं आहे. 

तत्पूर्वी चित्रा वाघ यांनी पतीला वाचवण्यासाठी भाजपामध्ये जात असल्याचं पवारांना सांगितलं होतं. ईडी, सीबीआय यांचा वापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जात आहे. सरकार राज्य बँकेद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपामध्ये येण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप पवारांनी केला होता. चित्रा वाघ यांचे पती चौकशीच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे चित्रा वाघ घाबरल्या आहेत. चित्रा वाघ मला भेटल्या असून, पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असं पवार म्हणाले होते. आम्ही त्यांना काहीही मदत करू शकत नसल्याचंही पवारांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. 
 

Web Title: Chitra Wagh's entering bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.