Children's Day: अभिनेता सैफकडून तैमुरला खास भेट, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 18:49 IST2017-11-14T18:42:30+5:302017-11-14T18:49:24+5:30

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांने बालदिनाचे औचित्य साधून मुलगा तैमुरसाठी एक खास भेटवस्तू खरेदी केली आहे. या भेटवस्तूची किंमत एेकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

Children's Day: A special gift from actor Saif to Taimur; | Children's Day: अभिनेता सैफकडून तैमुरला खास भेट, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का !

Children's Day: अभिनेता सैफकडून तैमुरला खास भेट, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का !

ठळक मुद्देबालदिनानिमित्त तैमुरसाठी खास कार खरेदीकिंमत एकूण तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. डिसेंबर महिन्यात 20 तारखेला तैमुरचा वाढदिवस

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांने बालदिनाचे औचित्य साधून मुलगा तैमुरसाठी एक खास भेटवस्तू खरेदी केली आहे. या भेटवस्तूची किंमत एेकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
येत्या डिसेंबर महिन्यात 20 तारखेला अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा मुलगा तैमुरचा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्या या वाढदिवसाची उत्सुकता बॉलिवूड मंडळीसह सा-यांनाच आहे. मात्र, त्याआधीच सैफ अली खानने तैमुरला भेटवस्तू दिली आहे. 


तैमुरसाठी सैफ अली खानने एक आलिशान अशी एसआरटी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 1.7 कोटी रुपये इतकी आहे. या कारचा कलर लाल आहे. ज्यावेळी ही कार खरेदी करण्यासाठी मुंबईतील वरळी येथील शोरुमध्ये सैफ अली खान आला, त्यावेळी या कारबद्दल उपस्थित पत्रकारांनी विचारले. त्यावर सैफ अली खान म्हणाला आज बालदिनानिमित्त खास तैमुरसाठी ही कार खरेदी केली आहे. या कारच्या मागील सीटवर लहान मुलांना बसण्यासाठी विशेष जागा आहे. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या कारची विशेष डिझाइन करण्यात आली आहे. तसेच, माझ्यामते, त्याला सुद्धा लाल कलरची कार आवडते, असेही तो यावेळी म्हणाला. 



 

Web Title: Children's Day: A special gift from actor Saif to Taimur;