Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजलेल्या बाळाला BMC रुग्णालयानं विव्हळत ठेवलं, Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 19:13 IST

भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओ एक कुटुंब भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात डॉक्टरांच्या येण्याची प्रतिक्षा करत आहे.

मुंबई – जगातील सर्वात श्रीमंत महापालिका असा मुंबई महापालिकेचा उल्लेख केला जातो. २७ हजार कोटींचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका सादर करते पण याच महापालिकेच्या हॉस्पिटलमधील सर्वात विदारक चित्र आज समोर आलं आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी याबाबतचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वसामान्य माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओ एक कुटुंब भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात डॉक्टरांच्या येण्याची प्रतिक्षा करत आहे. यात एक माणूस ज्याच्या अंगावर भाजलेल्या जखमा आहेत. इतकचं नाही तर या माणसासोबत महिला आणि तिचं तान्हं बाळही वेदनेने विव्हळत असल्याचं दिसून येते. त्यावेळी संबंधित रुग्णालयातील स्टाफ एका टेबलावर बसून फोनवर बोलत असतं पण कुणीही त्याठिकाणी पीडित कुटुंबाच्या उपचारासाठी धावून येत नाही.

याबाबत आमदार नितेश राणे म्हणाले की, ही दृश्य आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नायर रुग्णालयातील आहेत. सिलेंडर स्फोटात कुटुंब होरपळून निघालं. तान्हं बाळ विव्हळत आहे. हे पाहून काळजाचं पाणी होईल पण डॉक्टरांचं मात्र लक्ष नाही. पेग्विंनच्या प्रेमात मशगूल आहेत की त्यांना हा आक्रोश ऐकायला येत नाही अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

त्यानंतरच्या ट्विटमध्ये छोट्याश्या चिमुकल्या बाळानं वेदनेनं विव्हळत आपले प्राण सोडले. ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. या कुटुंबाला दुखातून सावरण्याचं बळ मिळो. आदित्य ठाकरे यांनी माणुसकी जपा, कारण आपल्या कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो अशी जहरी टीका केली आहे.  

टॅग्स :नीतेश राणे आदित्य ठाकरे