मुख्यमंत्र्यांच्या सुनेने धरला ठेका, घातली फुगडी; देवनार येथे रंगला मंगळागौरीचा सोहळा

By मनोहर कुंभेजकर | Updated: August 29, 2023 16:25 IST2023-08-29T16:24:58+5:302023-08-29T16:25:27+5:30

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात खासदार शेवाळे यांनी देखील हजेरी लावली.

Chief Minister's daughter-in-law Vrushali Shinde holds fugadi; A Mangalaguri ceremony was held at Deonar | मुख्यमंत्र्यांच्या सुनेने धरला ठेका, घातली फुगडी; देवनार येथे रंगला मंगळागौरीचा सोहळा

मुख्यमंत्र्यांच्या सुनेने धरला ठेका, घातली फुगडी; देवनार येथे रंगला मंगळागौरीचा सोहळा

मुंबई  : हिंदू संस्कृतीतील रितीनुसार, पारंपारिक पद्धतीने शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौरीच्या सोहळ्यात, मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी  फुगडीचा फेर धरला. तसेच सगळ्यांसोबत मंगळागौरीच्या गाण्यावर त्यांनी ठेकाही धरला. 

खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी आणि दक्षिण - मध्य मुंबईच्या संपर्कप्रमुख कामिनी  शेवाळे यांच्या वतीने व्ही बॅनक्वॅट हॉल वामन तुकाराम मार्ग, शताब्दी रुग्णालय शेजारी , गोवंडी येथे आयोजित केलेल्या या सोहळ्याला वृषाली शिंदे यांसह शिवसेनेच्या प्रवक्त्या-उपनेत्या  शीतल म्हात्रे, उपनेत्या तृष्णा विश्वासराव, महिला विभाग संघटिका सुनिता वैती आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी सुप्रसिद्ध स्केच आर्टिस्ट  मृदुला चुरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात खासदार शेवाळे यांनी देखील हजेरी लावली.  मंगळागौरीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता - भगिनींनी विविध संस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेत स्वतःही ठेका धरला.

Web Title: Chief Minister's daughter-in-law Vrushali Shinde holds fugadi; A Mangalaguri ceremony was held at Deonar