Join us

मुख्यमंत्री ठाकरे आज अयोध्येला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 06:27 IST

आधीच्या कार्यक्रमानुसार ते सायंकाळी शरयू नदीच्या तिरावर आरती करणार होते मात्र नवीन कार्यक्रमानुसार आता ते आरती करणार नाहीत.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी सहकुटुंब अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. यावेळी शिवसेनेचे खासदार, मंत्री यासह अनेक शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. आधीच्या कार्यक्रमानुसार ते सायंकाळी शरयू नदीच्या तिरावर आरती करणार होते मात्र नवीन कार्यक्रमानुसार आता ते आरती करणार नाहीत.मुख्यमंत्री सकाळी ११ ला विमानाने लखनौस जातील आणि तेथून मोटारीने अयोध्येला जाणार आहेत. दुपारी आधी ते पत्र परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर रामजन्मभूमीच्या ठिकाणी जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतील. रात्री ते मुंबईला परततील.मुख्यमंत्री ठाकरे यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लखनौला जाऊन आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी या दौऱ्यासाठी संपूर्ण सहकार्य करू असे आदित्यनाथ यांनी सांगितले. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अयोध्येला जात आहेत.कोरोनाचे संकट असल्याने गर्दी टाळावी, अशी विनंती आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दूरध्वनीवरून गुरुवारी रात्री केली अशी माहिती आहे. आधीच अनेक शिवसैनिक अयोध्येला पोहोचलेत. शरयू तिरावर आरती केली असती तर गर्दी उसळली असती म्हणूनच आरती रद्द केल्याची माहिती आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेअयोध्या