Join us

उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री दुसऱ्यांदा ‘मातोश्री‘वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 03:31 IST

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही दुसरी ‘मातोश्री’ भेट ठरली.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर दाखल झाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही दुसरी ‘मातोश्री’ भेट ठरली.या वेळी फडणवीस यांच्याबरोबर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. या वेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यादरम्यान महत्त्वपूर्ण बैठक झाल्याचे समजते. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेही या वेळी उपस्थित होते. शिवसेनेच्या २३ आणि भाजपाच्या २५ उमेदवारांच्या यांद्यासंदर्भात या वेळी चर्चा झाल्याचे समजते. तसेच युतीमुळे नाराज झालेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले व इतर नाराज घटकांच्या संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. या घटकांची नाराजी दूर करण्यासाठी पावले उचलण्यात येतील असे या वेळी ठरले. आगामी निवडणुकीत राज्यात ४५ जागा जिंकण्यासाठी एकदिलाने काम करण्याचे या वेळी ठरले.

टॅग्स :लोकसभा निवडणूकदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे