म्हाडाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 06:19 IST2025-06-13T06:19:43+5:302025-06-13T06:19:54+5:30

MHADA: नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होण्यासाठी ‘म्हाडा’च्या विविध नियमावलींमध्ये सुधारणा करण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी त्याचा आढावा घेतला. याशिवाय म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

Chief Minister reviews MHADA projects | म्हाडाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

म्हाडाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होण्यासाठी ‘म्हाडा’च्या विविध नियमावलींमध्ये सुधारणा करण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी त्याचा आढावा घेतला. याशिवाय म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा, बांधकाम परवानगीसाठीचे विकास शुल्कावरील दंडनीय व्याजाचा दर कमी करणे, म्हाडास उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त क्षेत्रफळाच्या सदनिका संक्रमण शिबिरासाठी वापरणे अथवा सोडतीद्वारे विक्री करणे, रहिवाशांना अतिरिक्त क्षेत्राचा लाभ देणे व यावर प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्राचा लाभ देणे आदीवर सकारात्मक चर्चा झाली.

सदनिका हस्तांतरणाचे नियोजन 
वरळी बीडीडी चाळीतील ९८६९ पुनर्वसन सदनिकांपैकी ३८८८ सदनिकांचे काम प्रगतिपथावर असून, पुढील दोन आठवड्यांत ५५६ सदनिकांचे हस्तांतरण होणार आहे. तसेच १४१९ सदनिकांचे सप्टेंबर २०२५ मध्ये, १६४२ सदनिकांचे हस्तांतरण ऑगस्ट २०२७ पर्यंत केले जाणार आहे.  नायगाव बीडीडी चाळीतील ३३४४ सदनिकांपैकी १९३८ सदनिकांचे काम प्रगतिपथावर असून, सप्टेंबर २०२५ मध्ये ८६४ सदनिकांचे हस्तांतरण करण्याचे नियोजन आहे. ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील २५६० पुनर्वसन सदनिकांपैकी १२४१ सदनिकांचे काम प्रगतिपथावर असून, ३४२ सदनिकांचे हस्तांतरण डिसेंबर २०२५ पर्यंत होणार आहे. 

सिद्धार्थनगर पत्राचाळ प्रकल्पाला गती
गोरेगाव येथील सिद्धार्थनगर पत्राचाळ प्रकल्पातील मूळ ६७२ सभासदांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले  आहे. 
तसेच चार भूखंडांवरील १२४३ सदनिका बांधकामासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. 
सुरभी सोसायटी, पोलिस वसाहत, आरामनगर अभिन्यास, मोतीलालनगर, अभ्युदयनगर प्रकल्प, वांद्रे रिक्लेमेशन व आदर्शनगर वरळी वसाहत, जीटीबीनगर सायन कोळीवाडा वसाहत पीएमजीपी वसाहत, पूनमनगर आदी प्रकल्पांच्या पुनर्विकासाचा यावेळी आढावा घेण्यात आला.

Web Title: Chief Minister reviews MHADA projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.