नंदुरबार जिल्ह्यात कूपोषण कमी करण्यासाठी मेळघाट पॅर्टन राबवण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक; डॉ दीपक सावंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 01:36 PM2024-03-17T13:36:48+5:302024-03-17T13:37:23+5:30

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी मेळघाट पॅर्टन राबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असल्याची माहिती कूपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष व माजी आरोग्य मंत्री डॅा दीपक सावंत यांनी लोकमतला दिली.

Chief Minister positive to implement Melghat Parton to reduce malnutrition in Nandurbar district; dr Deepak Sawant's information | नंदुरबार जिल्ह्यात कूपोषण कमी करण्यासाठी मेळघाट पॅर्टन राबवण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक; डॉ दीपक सावंत यांची माहिती

नंदुरबार जिल्ह्यात कूपोषण कमी करण्यासाठी मेळघाट पॅर्टन राबवण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक; डॉ दीपक सावंत यांची माहिती

मुंबई - नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी मेळघाट पॅर्टन राबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असल्याची माहिती कूपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष व माजी आरोग्य मंत्री डॅा दीपक सावंत यांनी लोकमतला दिली.तसेच वणूबंधू या योजने अंर्तगत आरोग्य सेविका मुदत ३१ मार्चला संपत असून त्यांना मुदत वाढ आवश्यक आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आपण अवगत केले असून लवकरच आपला अहवाल त्यांना सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

नंदुरबार जिल्ह्यात कूपोषण परिस्थिती व टास्क फोर्सने दिलेल्या अहवालाची अंमल बजावंणीसाठी नंदुरबार नवापूर अक्कल कुवा येथील खापरी येथे जाऊन भेट दिली. येथे कूपोषणासाठी संबंधित खात्याकडून असलेल्या योजनांची एकत्रितपणे अंमल बजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याच्या त्यांनी सूचना  दिल्या. हा सर्व विभाग विशेषत: अक्कलकुवा घडगाव शहादा येथे   डोंगराळ भागातील आदिवासी पाडे संपर्कासाठी कठीण असून येथे  स्थलांतर हा मोठा प्रश्न असून त्या वर त्वरित उपाययोजना व्हाव्यात.तसेच ट्रॅकिंग साठी अडचणी येतात सॅम मॅम मुलांची संख्या कमी करून त्यानी सर्व साधारण गटात आणण्यासांठी प्रसूती पूर्व  प्रसूती दिनांक  हे मॅानीटर करणे गरजेचे आहे. तसेच लो बर्थ वेट म्हणजे जन्म जात कमी वजन असलेली मुलं. ही कुपोषणाच्या फेऱ्यात सापडतात त्या साठी बाळाचे वजन जन्म जात व्यवस्थित असावे अश्या सूचना आपण आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

त्याच बरोबर नाशिक सुरगणा येथील अंगणवाडी येथे मुलांशी संवाद साधला शासनातर्फे अंगणवाडी सेविकांना दिला जाणारा मोबाईल दिला, बाळासांठी महिला बाल विकास कडून दिला जाणारा कीटही ही वाटण्यात आला.तसेच येथील आश्रम शाळेलाही भेट दिली . तिथेही मुलीचे हिमोग्लोबीन वर्षातून दोन ते तीन वेळा तपासून कमी असल्यास हिमेग्लोबीन वाढीसाठी प्रयत्न व्हावेत.अशा सूचना दिल्या. सुरगणा पेठ भागात चाईल्ड ट्रीटमेंट सेन्टर व एन्. आर. सी न्यूट्रीशन रिहॅब सेंटर आवश्यक आहे त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली.
 

Web Title: Chief Minister positive to implement Melghat Parton to reduce malnutrition in Nandurbar district; dr Deepak Sawant's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.