Join us

या लढाईत 'राज' आमच्यासोबत, ८३ वर्षीय आजींसोबतही साधला मुख्यमंत्र्यांनी संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 06:06 IST

तनिष्का मोरे या सहा महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनावर यशस्वी मात केली. आज मी तिच्या आईशी बोललो. ८३ वर्षांच्या एका आजीबाईंनी कोरोनावर मात केली

मुंबई - केंद्र व राज्य सरकार कोरोनाचा मुकाबला हातात हात घालून करीत असल्याचे सांगत राज्यातील जनतेशी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. यावेळी त्यांनी वांद्रे  येथे घडलेल्या घटनेचा आवर्जून उल्लेख केला, तसेच राजही या लढ्यात आमच्यासोबत असल्याचे म्हटले. विविध राजकीय पक्षांचे नेते पक्षाची लेबल बाजूला ठेवून कोरोनाविरुद्ध लढत आहेत. पंतप्रधान मोदी आमच्यासोबत आहेत. अमित शहा यांच्याशी मी आजच बोललो. सोनिया गांधी, शरद पवार तर आहेतच राजदेखील सोबत आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचा विशेष उल्लेख केला.

सहा महिन्यांची बालिका अन् ८३ वर्षांच्या आजीबाई

तनिष्का मोरे या सहा महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनावर यशस्वी मात केली. आज मी तिच्या आईशी बोललो. ८३ वर्षांच्या एका आजीबाईंनी कोरोनावर मात केली. त्यांच्याशी देखील बोललो. कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं, असं समजू नका, या शब्दात ठाकरे यांनी जनतेला विश्वास दिला. च्फक्त कोरोना कोरोना आणि बाकी काहीच कोरोना, अशी आमची यंत्रणा करणार नाही. तर दुर्गम आदिवासी भागात अन्नधान्य पुरवठ्यापासून सर्व इतर कामे तेवढ्याच तत्परतेने करण्यात येतील.च्खरीप हंगाम तोंडावर आहे. अशावेळी खते, बी-बियाणे शेतीची अवजारे यांची दुकाने सुरू राहतील.च्कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढे यावे आणि नावे नोंदवावीत, असे आवाहन मी केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि २१ हजार लोकांनी त्यासाठीची नोंदणी केली आहे. अन्नसुरक्षा योजनेतील तांदूळ वाटप सुरू झाले आह.े त्याबरोबरच डाळीचे वाटपही करावे, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे आणि ती लवकरच मान्य होईल, असा विश्वास आहे.

च्कोरोनाच्या संकटात राज्याची अर्थव्यवस्था राज्याच्या अर्थव्यवस्थेची घडी बिघडू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगट तर माहिती तंत्रज्ञान, अर्थक्षेत्रातील तज्ज्ञांचा दुसरा एक गट तयार करण्यात आला आहे.च्कोरोनावर लस शोधून काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आम्ही तशी परवानगी केंद्राकडे मागितली ८आहे आणि महाराष्ट्र याबाबत देशालाच नाहीतर जगाला दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

 

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेमुंबई