Join us

महापालिकेच्या मुख्य अभियंत्यास मारहाण, महापौरांकडून आरोपाचे खंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 18:28 IST

महापौरांनी या आरोपांचे खंडन करीत अशी कोणतीही घटना घडलीच नसल्याचे म्हटले आहे.

मुंबई - वांद्रे, कला नगर येथील नाल्याच्या पाहणीसाठी गेलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची मुख्य अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विद्याधर खणकर यांच्याबरोबर बाचाबाची झाली. त्यावेळी, महापौरांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यकर्त्यांनी खणकर यांना मारहाण केल्याचा आरोप अभियंत्यांनी केला आहे. महापौरांनी या आरोपांचे खंडन करीत अशी कोणतीही घटना घडलीच नसल्याचे म्हटले आहे. मात्र, मुख्य अभियंत्यास मारहाण केल्याचा निषेध करत पालिकेच्या इतर सर्व अभियंतांनी आयुक्तांच्या कार्यालयात धाव घेतली आहे. तसेच, मारहाणीचा निषेध नोंदवत आयुक्तांकेड महापौरांची तक्रार करण्यास आली आहे. दरम्यान, या बाचाबाचीनंतर पोलिसांनी मध्यस्थी करुन प्रकरण शांत केले, तरी घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.   

टॅग्स :मुंबईपोलिसआयुक्त