दरोड्याच्या तयारीत असलेले छोटा शकीलचे हस्तक जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 05:52 IST2018-12-04T05:52:34+5:302018-12-04T05:52:54+5:30

दरोड्याच्या तयारीत असलेल्या छोटा शकीलच्या चार हस्तकांना नागपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

Chhota Shakeel, who is preparing for the robbery | दरोड्याच्या तयारीत असलेले छोटा शकीलचे हस्तक जाळ्यात

दरोड्याच्या तयारीत असलेले छोटा शकीलचे हस्तक जाळ्यात

मुंबई : दरोड्याच्या तयारीत असलेल्या छोटा शकीलच्या चार हस्तकांना नागपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
नागपाडास्थित एका मॉलमधील कामकाज संपवून काही व्यापारी सायंकाळी कॅश घेऊन घरी जातात. गेल्या काही दिवसांपासून हे दरोडेखोर अशा व्यापाऱ्यांवर मागावर होते. रविवारी ते या व्यापाºयांना लुटणार असल्याची माहिती नागपाडा पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे नागपाडा पोलिसांच्या पथकाकडून मुंबई सेंट्रल परिसरात सापळा रचण्यात आला. यात चार जण पोलिसांच्या हाती लागले, तर काही जणांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
अटक करण्यात आलेल्या चौकडीतील काही जण हे छोटा शकीलचे हस्तक असून, ते अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा हत्यार बाळगणे, चोरी, घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे.
>खेळण्यातील बंदुकीचाही वापर...
दरोड्याचया तयारीत असलेल्या अटक आरोपींकडून पोलिसांनी १ गावठी कट्टा, २ चॉपर, मिरचीपूडसह खेळण्यातली बंदूकही जप्त केली आहे.

Web Title: Chhota Shakeel, who is preparing for the robbery