ॲप आधारित टॅक्सीला ‘छावा राइड’ देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:56 IST2025-08-08T13:55:34+5:302025-08-08T13:56:33+5:30

केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) आधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेवेळी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. 

'Chhawa Ride' will compete with app-based taxis | ॲप आधारित टॅक्सीला ‘छावा राइड’ देणार टक्कर

ॲप आधारित टॅक्सीला ‘छावा राइड’ देणार टक्कर

मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) छावा राइड नावाचा ॲप लवकरच तयार करणार आहे. या माध्यमातून बस, रिक्षा, टॅक्सी व ई-बस या वाहन सेवा सुरू करणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) आधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेवेळी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. 

चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी सुरू करणार आहे. मंत्री सरनाईक म्हणाले, राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी देणे, भरमसाठ नफा कमवून प्रवासी व चालकांना वेठीस धरणाऱ्या कंपन्यांच्या जोखंडातून मुक्त करण्याच्या उद्देशाने प्रवासी ॲपद्वारे बस, रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू करण्याचे निश्चित केले आहे. 

राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालविण्यासाठी एसटी महामंडळाची प्रवाशांवर असलेली निष्ठा, आणि वर्षानुवर्षापासूनची विश्वासार्हता उपयोगी पडणार असून उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होणार आहे.
प्रताप सरनाईक, मंत्री परिवहन

उत्पन्नाचा स्रोत
शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने  एसटीमार्फत हे ॲप सुरू करण्यात येणार आहे.  भविष्यात एसटीला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करणे व प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश समोर ठेवून हे ॲप एसटी महामंडळाने चालवणे योग्य राहील, असे सरनाईक म्हणाले. 

एसटीने ॲप सुरू केल्यास प्रवाशांना विश्वासार्ह बस, रिक्षा, टॅक्सी सेवा 
मिळणार आहे.


 

Web Title: 'Chhawa Ride' will compete with app-based taxis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.