Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी छत्रपती, मग अयोध्येत आरती!; नितेश राणे यांची शिवसेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 03:06 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील छत्र बसविण्याचे आश्वासन ज्यांना पाळता येत नाही त्यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या गप्पा मारू नयेत, अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी टीका केली.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील छत्र बसविण्याचे आश्वासन ज्यांना पाळता येत नाही त्यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या गप्पा मारू नयेत, अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी टीका केली.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्यावर छत्र उभारण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र अद्याप ते अपूर्ण आहे. याच मुद्द्यावर शिवसेनेला लक्ष्य करत नितेश राणे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारले. शिवाय, ‘आम्ही दिलेले शब्द पाळतो, पहिले आमचे छत्रपती मग जाऊ करा अयोध्येत आरती’ असा ट्विट करत शिवसेनेला टोलाही लगावला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात शुक्रवारी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारले. मंदिर उभारण्याची उद्धव ठाकरेंची कुवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.‘शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटे उभे करून ठेवले आहे. तुमची कुवत नसेल तर सांगा शिवसेने इथे रायगड उभा करेल’, असे ठाकरे म्हणाले होते. मात्र, पुढे याबाबत शिवसेनेकडून काही झाले नाही. हीच संधी साधत नितेश राणे यांनी छत्र उभारत शिवसेनेवर कुरघोडी केली.

टॅग्स :नीतेश राणे