Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 18:30 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेते पक्षांतर करुन भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश करत आहे.

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेते पक्षांतर करुन भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश करत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ देखील पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चांना उधान आले होते. यावर छगन भुजबळ यांनी आज मुंबईत शिवसेना प्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्टवादीच्या दिग्गज नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. त्याचप्रमाणे छगन भुजबळ देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र भुजबळांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चा फेटाळत  मै यही हूँ, मै यही हूँ, मै यही हूँ अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

याआधी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर,  आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार वैभव पिचड, मधुकरराव पिचड, आमदार दिलीप सोपल, आमदार संदीप नाईक, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील या दिग्गज नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केला होता.

 

टॅग्स :छगन भुजबळराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना