छगन भुजबळ लीलावती रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 05:59 IST2018-05-15T05:59:54+5:302018-05-15T05:59:54+5:30
केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

छगन भुजबळ लीलावती रुग्णालयात दाखल
मुंबई : केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करीत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. आधी त्यांना जे.जे. रुग्णालयात आणि नंतर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीत जामीन मिळाल्याने तब्बल सव्वा दोन वर्षांनी भुजबळ घरी परतले. चार दिवस घरी आराम केल्यानंतर पुढील उपचारांसाठी ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. भुजबळ कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.