Mumbai Local: मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:06 IST2025-06-07T11:05:00+5:302025-06-07T11:06:02+5:30

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी घेतला जाणार मेगाब्लॉक

Check the mega block schedule and then get out Night block on 'Western Railway' | Mumbai Local: मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक

Mumbai Local: मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मीरा रोड आणि भाईंदरदरम्यान मेट्रो-९ च्या गर्डर लॉन्चिंगसाठी तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

शनिवार, रविवार आणि सोमवारी मध्यरात्री १२:४५ ते ३:१५ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक घेतला जाईल. शनिवारी शेवटच्या दोन चर्चगेट-विरार गाड्या रद्द होतील. रविवारी सकाळी १०:३५ ते ३:३५ या कालावधीत चर्चगेट- मुंबई सेंट्रलदरम्यान मेगाब्लॉक राहिल.

  • मुख्य : विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ८ ते दुपारी १:३० पर्यंत ५ व्या आणि ६ व्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काही मेल/एक्स्प्रेस  अप आणि डाऊन  जलद मार्गावर वळवण्यात येतील.
  • हार्बर : पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाइन वगळून) अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पनवेल-सीएसएमटीदरम्यानच्या सेवा रद्द केल्या आहेत. 
  • ट्रान्स हार्बर : पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ पर्यंत आणि ठाण्यातून पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०:०१ ते दुपारी ३:२० पर्यंत रद्द राहतील. 

Web Title: Check the mega block schedule and then get out Night block on 'Western Railway'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.