Join us

अभिनेत्रीच्या बनावट फेसबुक पेजद्वारे फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 05:34 IST

अभिनेत्री दिव्या खोसलाच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून एका चाहत्याला ४० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार ओशिवरामध्ये उघडकीस आला. या प्रकरणी कर्नाटकमधून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मुंबई - अभिनेत्री दिव्या खोसलाच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून एका चाहत्याला ४० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार ओशिवरामध्ये उघडकीस आला. या प्रकरणी कर्नाटकमधून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिच्या नावाने प्रजवाल गोपाल कृष्णा याने बनावट फेसबुक पेज तयार केले. त्याच वेळी एका चाहत्याने या पेजवर एक व्हिडीओ शेअर केला व हा व्हिडीओ डॉक्युमेट्री फिल्मसाठी वापरण्याची विनंती केली. आरोपीने त्याच्यासोबत संवाद वाढवला व डॉक्युमेंट्री फिल्मच्या नावाखाली त्याच्याकडून ४० लाख रुपये उकळले. पैसे देऊनही डॉक्युमेंट्री फिल्मबाबत माहिती पुढे येत नसल्याने त्याने गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानुसार, गुन्हे शाखने या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपासात ते खाते बनावट असल्याचे स्पष्ट झाले व याच गुन्ह्यांत गुरुवारी आरोपीला कर्नाटकमधून बेड्या ठोकल्या.

टॅग्स :फेसबुकगुन्हामुंबई