Join us
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास संपादन करत २९.८२ लाखांची फसवणूक! साकिनाक्यात सेल्स मार्केटिंग कर्मचाऱ्यावर गुन्हा 

By गौरी टेंबकर | Updated: May 15, 2024 19:21 IST

तक्रारदार प्रशांत मेहता (४१) हे तक्रारदार असून रँक इंटरनॅशनल कंपनीत काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या कंपनीमध्ये विशाल भारतीय याला सप्टेंबर २०१७ मध्ये बिझनेस डेव्हलमेंट आणि प्रॉडक्ट मार्केटिंग व सेलची जबाबदारी निभावत होता.

मुंबई: विश्वास संपादन करत २९.८२ लाख रुपयाचा चुना लावणाऱ्या सेल्स मार्केटिंग कर्मचाऱ्या विरोधात कंपनीच्या जनरल मॅनेजरने तक्रार दिली. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून साकीनाका पोलीस अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार प्रशांत मेहता (४१) हे तक्रारदार असून रँक इंटरनॅशनल कंपनीत काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या कंपनीमध्ये विशाल भारतीय याला सप्टेंबर २०१७ मध्ये बिझनेस डेव्हलमेंट आणि प्रॉडक्ट मार्केटिंग व सेलची जबाबदारी निभावत होता. त्याचे चांगले काम पाहून वर्षभरानंतर कंपनीने त्याला एका झोनची जबाबदारी दिली. त्यात हैदराबाद तेलंगणा आणि महाराष्ट्राचा काही भाग समाविष्ट होता. भारतीय हा हैदराबाद या ठिकाणी राहून कंपनीचे काम सांभाळायचा. कंपनीकडून त्याला दिलेल्या सर्व प्रॉडक्टच्या डिलिव्हरी चलन वरुन ग्राहकांना प्रॉडक्ट दाखवत कंपनीकडून सोन्या चांदीचे दागिने, चेन तसेच सुटे भाग कुरिअरने पाठवायचा. मात्र जानेवारी २०२४ नंतर भारतीय याने कंपनीला हिशोब देणे बंद केले. त्यामुळे कंपनीत त्याच्याकडून त्याला दिलेली सोन्या चांदीच्या दागिने परत मागितले. त्यात तो टाळाटाळ करू लागला आणि अखेर चौकशीत त्याने २९ लाख ८२ हजार १७ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप मेहता यांनी त्यांच्या कंपनीतर्फे केल्यानंतर साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसधोकेबाजी