Join us  

Chartered Plane Crashed In Mumbai : धक्कादायक !उड्डाण योग्यता प्रमाणपत्र नसतानाही विमानाची चाचणी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 8:34 AM

विमान अपघाताबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यू.व्हाय. एव्हिएशनचे अकाऊंटेबल मॅनेजर अनिल चौहान यांनी सांगितले की

मुंबई - चाचणीसाठी उडवण्यात आलेले खासगी विमान गुरुवारी (28 जून) घाटकोपर येथे भरवस्तीत कोसळून पायलट, तंत्रज्ञ आणि पादचाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. हे चार्टर्ड विमान जुहू एअरपोर्टवर लँड करणारच होते, मात्र तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर पश्चिमेतील जीवदया लेनमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात हे विमान कोसळलं. यू.व्हाय. एव्हिएशन प्रा.लि.चे किंग एअर सी-90 व्हीटी यूपीझेड असे हे विमान होते. दरम्यान, विमान अपघाताबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यू.व्हाय. एव्हिएशनचे अकाऊंटेबल मॅनेजर अनिल चौहान यांनी सांगितले की, विमानाचे मालकी हक्क जरी आमच्याकडे असेल तरीही इन्डॅमर कंपनीच्या अंतर्गत विमानाची देखरेख होत होती. विमान आमच्याकडे पूर्णतः सोपवण्यात आलेले नव्हते. शिवाय,  उड्डाण योग्यतेचे प्रमाणपत्र म्हणजे एअरवर्दीनेस विभागाकडून उड्डाणाची परवानगीदेखील मिळालेली नव्हती. दरम्यान, विमान टॅक ऑफ करतानाच व्हिडीओ इनडॅमर कंपनीनं रेकॉर्डदेखील केला. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला आहे. 

पुढे चौहान यांनी असे सांगितले की, अपघातग्रस्त चार्टर्ड विमानाने सहा वर्षांपूर्वी शेवटचे उड्डाण केले होते. मागच्या दीडवर्षांपासून हे विमान इनडॅमर या मेंटेन्स कंपनीच्या हँगरमध्ये उभे होते. या विमानामध्ये मोठया प्रमाणावर दुरुस्तीची आवश्यकता असल्याने हे विमान हँगरमध्ये होते. आधी उत्तर प्रदेश सरकारकडे हे विमान होते.  

दरम्यान, उड्डाणासंबंधी मारिया झुबेर यांच्या पतीनंही आरोप केले आहेत. हवामान वाईट असल्यानं सहवैमानिक मारिया यांनी विमानाच्या चाचणीला विरोध केला होता. त्यानंतरही चाचणी घेण्यास भाग पाडले, असा आरोप त्यांचे पती प्रभाग कथुरिया यांनी केला आहे. 

 

टॅग्स :मुंबई विमान दुर्घटनाघाटकोपरविमानअपघात