Join us

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 03:11 IST

महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा उद्या २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्क ,दादर होणार आहे.

मुंबई : महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा उद्या २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्क ,दादर होणार आहे. राज्यभरातून अनेक कार्यकर्ते आणि चाहते यावेळी उपस्थित राहणार आहेत. गर्दी होऊन वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रस्ते वाहतूकीत काही बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांच्यावतीने देण्यात आली. दादर येथील काही रस्ते नो पार्किंग म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग(सिद्धिविनायक मंदिर ते एम बी राऊत मार्ग ) ,केळूसरकर मार्ग, एम बी राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग ,दादासाहेब रेगे मार्ग ,ले. दिलीप गुप्ते मार्ग ,एन सी केळकर मार्ग ,कीर्ती कॉलेज मार्गिका ,काशिनाथ धुरू मार्ग ,पी बाळू मार्ग, आदर्श नगर ,वरळी कोळीवाडा , रॅक ४ मार्ग ,पंच उद्यान ,सेनापती बापट मार्ग , रानडे मार्ग ,पी एन कोटणीस मार्ग ,हिंदुजा रुग्णालय यांचा समावेश आहे . यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग सिद्धिविनायक मंदिर ते हरी ओम जंक्शन ,माहीम दरम्यान वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून पयार्यी मागार्ची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सिद्धिविनायक जंक्शन ते एस के बोले रोड - आगर बाजार - चर्च - गोखले मार्ग , राजा बडे चौक, एल जे मार्ग ते गोखले मार्ग ,दिलीप गुप्ते मार्ग ,एम बी राऊत मार्ग,बाळ गोविंद मार्ग हे पयार्यी मार्ग उपलब्ध आहेत.

टॅग्स :मुंबईमुख्यमंत्री