अग्निशमन दलाच्या संदेशवहन यंत्रणेत ५९ वर्षांनंतर बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:47 AM2019-02-19T02:47:03+5:302019-02-19T02:47:15+5:30

सन २०१५ मध्ये काळबादेवीमधील गोकुळ निवास इमारतीला लागलेल्या आगीत तत्कालीन प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी शहीद झाले होते.

Changes in the transmission system of the firefighters after 59 years | अग्निशमन दलाच्या संदेशवहन यंत्रणेत ५९ वर्षांनंतर बदल

अग्निशमन दलाच्या संदेशवहन यंत्रणेत ५९ वर्षांनंतर बदल

Next

मुंबई : जागतिक दर्जाच्या मुंबईचा विकास झाल्यानंतरही या शहरात आपत्ती काळात बचाव कार्यासाठी असलेल्या अग्निशमन दलातील संदेश वहन यंत्रणा मात्र ५९ वर्षांपूर्वीची आहे. याचा परिणाम मदत कार्यावर होत असल्याने ते अनेक दुर्घटनांमध्ये जवानांच्या जीवावर बेतले़ अखेर या यंत्रणेत बदल करुन डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली आणण्यात येणार आहे.

सन २०१५ मध्ये काळबादेवीमधील गोकुळ निवास इमारतीला लागलेल्या आगीत तत्कालीन प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी शहीद झाले होते. याप्रकरणी नियुक्त समितीने अग्निशमन दलाची संदेशवहन यंत्रणा बदलण्याची शिफारस केली होती. हा बदल घडवून आणण्यातही काही वर्षे लोटली. अखेर नवे डिजिटल मोबाईल रेडिओ तंत्रज्ञान असलेले पाचशे संच खरेदी करण्यात येणार आहेत.

अग्निशमन केंद्र, अग्निशमन वाहने आणि नियंत्रण कक्षात ही यंत्रणा वापरली जाणार आहे. अग्निशमन दलात सध्या व्ही.एच.एफ. प्रणालीवर आधारित बिनतारी संदेश यंत्रणा वापरली जात आहे. यामध्ये वापरण्यात येणारे बिनतारी संच हे २० वर्षे जुने झाल्यामुळे कालबाह्य झाले आहेत. यांचे सुटे भाग बाजारात उपलब्ध होत नाहीत़ त्यांची दुरुस्ती व परीरक्षण वेळेत करता येत नाही. अग्निशमन दलाच्या कामात अडथळे येत असल्याने ही यंत्रणा खरेदी करण्यात येत आहे.

यामुळे यंत्रणेत बदल होणार
सध्या वापरात असलेली व्हीएचएफ प्रणालीवर आधारित एॅनलॉग यंत्रणा अग्निशमन दलात १९६० पासून कार्यरत आहे. मुंबईच्या भौगोलिक रचनेत मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे ही यंत्रणा तोकडी पडत आहे. काही नव्याने विकसित झालेल्या भागात तसेच उंच इमारतीत या यंत्रणेमुळे संपर्क होणे शक्य होत नाही. त्यामुळे ही यंत्रणा बदलण्यात येणार आहे. यासाठी ११ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

असे असेल नवे यंत्र...
च्हे यंत्र हेडफोन लावून वापरता येणार असल्याने बचावकार्याच्या वेळी हात मोकळे राहणार.
च्जीपीएस लोकेशन मिळू शकेल़ हे यंत्र एक मीटर पाण्यात ३० मिनिटे राहू शकते़
च्धूळ आणि जोरदार हवेचा परिणाम होत नाही़
च्वॉकीटॉकीवर एक बटण दाबून अतिमहत्वाचा संदेश पोहोचवता येऊ शकतो.
च्१४ ते १६ तास बॅटरी टिकून राहील.

Web Title: Changes in the transmission system of the firefighters after 59 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.