विद्यार्थ्यांसाठी सुट्टीत ‘चला वाचू या’ उपक्रम; महापालिकेचा पुढाकार, २५ वाचनालये सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 10:57 IST2025-04-26T10:57:18+5:302025-04-26T10:57:37+5:30

वाचनालयाच्या संपूर्ण व्यवस्थेसाठी अशासकीय संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पालिका क्षेत्रात जनजागृती व सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Chala Vachuya initiative for students during vacations; Municipal Corporation's initiative, 25 reading rooms opened | विद्यार्थ्यांसाठी सुट्टीत ‘चला वाचू या’ उपक्रम; महापालिकेचा पुढाकार, २५ वाचनालये सुरू

विद्यार्थ्यांसाठी सुट्टीत ‘चला वाचू या’ उपक्रम; महापालिकेचा पुढाकार, २५ वाचनालये सुरू

मुंबई - उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना मोबाइल आणि टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी, तसेच त्यांच्या वाचनात खंड पडू नये, यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने ‘चला वाचू या ! सुट्टीतील वाचनालय’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागातील मध्यवर्ती शालेय इमारतीत हे वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. २ मे ते १२ जूनदरम्यान अशी एकूण २५ वाचनालये राहणार आहेत.

पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम सुरू होत आहे. 
उन्हाळी सुट्टीत पालिका आणि खासगी शाळांतील इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना या वाचनालयाचा लाभ घेता येणार आहे. दररोज सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ दरम्यान ही वाचनालये त्यांच्यासाठी खुली ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुले-मुलींसाठी स्वतंत्र वर्ग 
पालिकेच्या प्रत्येक विभागातील एका मध्यवर्ती शाळेत २ मेपासून वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. तेथे भरपूर पुस्तके असणार आहेत. तसेच, मुले-मुली यांच्यासाठी स्वतंत्र वर्ग आणि स्वच्छतागृहाची सुविधा असेल. वाचनालयाच्या संपूर्ण व्यवस्थेसाठी अशासकीय संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पालिका क्षेत्रात जनजागृती व सर्वेक्षण करण्यात येत आहे.

पालकांचे संमतीपत्र आवश्यक
फलकावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर सर्व वाचनालयांची माहिती गुगल मॅपसह उपलब्ध होईल. येथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे ओळखपत्र, आधारकार्ड आणि पालकांचे संमतीपत्र असणे अनिवार्य आहे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे यांनी सांगितले.

प्रभागनिहाय या शाळांमध्ये सुरू होणार वाचनालय

ए - लॉर्ड हँरिस पालिका शाळा
बी- जनाबाई आणि माधवराव रोकडे पालिका शाळा 
सी- निजामपुरा पालिका शाळा 
डी- गिल्डरलेन आणि बाळाराम मार्ग पालिका शाळा
ई - न्यू भायखळा पूर्व, पाटणवाला मार्ग 
एफ/दक्षिण -परळ भोईवाडा पालिका शाळा
एफ/उत्तर - कोरबा मीठागर पालिका शाळा 
जी/दक्षिण - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका शाळा 
जी/ उत्तर - दादर वुलन मील पालिका शाळा 
एच/ पूर्व - शास्त्रीनगर पालिका उर्दू शाळा
एच/ पश्चिम - हसनाबाद पालिका शाळा 
के/ पूर्व - नित्यानंद मार्ग पालिका शाळा
के/ पश्चिम - विलेपार्ले पश्चिम पालिका शाळा 
पी/ दक्षिण - उन्नत नगर पालिका शाळा 
पी/ उत्तर - राणी सती मार्ग मराठी पालिका शाळा 
आर/ दक्षिण - आकुर्ली पालिका मराठी शाळा क्र. १ 
आर/मध्य - पोईसर पालिका हिंदी शाळा क्र.३ 
आर/उत्तर विभाग - भरूचा रोड पालिका शाळा
एल - नेहरू नगर पालिका शाळा 
एम पूर्व - शिवाजीनगर पालिका शाळा
एम पूर्व २ - गोवंडी स्टेशन पालिका मराठी शाळा क्र. २ 
एम पश्चिम - टिळक नगर पालिका शाळा 
एन विभाग - माणेकलाल मेहता पालिका शाळा 
एस विभाग - म. वि. रा. शिंदे मार्ग पालिका हिंदी शाळा 
टी विभाग - गोशाळा मार्ग पालिका शाळा

Web Title: Chala Vachuya initiative for students during vacations; Municipal Corporation's initiative, 25 reading rooms opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.