Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवडे चैतन्यधारा; राज्याला दिलासा; बळीराजा सुखावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 07:36 IST

मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांत मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, मराठवाड्यासह अपेक्षित ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून पुढील दोन ते तीन आठवडे सक्रिय राहणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, पाण्याच्या साठ्यात वाढ होईल, तर दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांतही दमदार पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटणार आहे. 

मान्सून पुन्हा सक्रियपुढील दोन ते तीन आठवडे राज्याच्या काही भागांसह देशातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय राहील, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

टॅग्स :पाऊसमुंबई