शाडूच्या गणेशमूर्तींना पसंती, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:51 AM2017-08-15T01:51:28+5:302017-08-18T14:50:33+5:30

गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून शाडूच्या मातीच्या मूर्तींची सर्वत्र प्रतिष्ठापना केली जात होती

Chadu's Ganesh idols prefer, but ... | शाडूच्या गणेशमूर्तींना पसंती, पण...

शाडूच्या गणेशमूर्तींना पसंती, पण...

Next

मुंबई : गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून शाडूच्या मातीच्या मूर्तींची सर्वत्र प्रतिष्ठापना केली जात होती, परंतु गेल्या ३० वर्षांमध्ये ती जागा प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींनी घेतली, परंतु प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींमुळे होणाºया प्रदूषणाबाबत सातत्याने होत असलेल्या जनजागृतीमुळे, काही प्रमाणात लोक आता पुन्हा शाडूच्या मातीच्या मूर्तींकडे वळले असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे, परंंतु अजूनही शाडूच्या मातीच्या मूर्तींना लोकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, असे मूर्तीकार प्रदीप म्हादुसकर यांनी सांगितले.
गेल्या ७८ वर्षांपासून म्हादुसकर कुटुंबीय शाडूच्या मातीच्या मूर्ती घडवित आहेत. म्हादुसकर यांनी सांगितले की, प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती या शाडूच्या मातीच्या मूर्तीच्या तुलनेने स्वस्त असतात. त्यांचे वजनही शाडूच्या मूर्तींपेक्षा कमी असते. शाडूच्या मातीच्या मूर्ती घडवायला खूप वेळ लागतो. प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींना घडविण्यास फार वेळ लागत नाही. त्यामुळे लोक प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींना प्राधान्य देतात, परंतु शाडूच्या मातीची मूर्ती पाण्यात तासाभरात विरघळते. याउलट प्लास्टर आॅफ पॅरीसची मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. शाडूच्या मातीच्या मूर्तीने पर्यावरणास कोणताही धोका नाही. मात्र, प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती पर्यावरणाच्या ºहासास कारणीभूत ठरतात. या गोष्टींकडे लोक खूप सहज दुर्लक्ष करतात. या दोन मूर्तींना पर्याय असलेल्या कागदाच्या मूर्तीसुद्धा उपलब्ध आहेत.

Web Title: Chadu's Ganesh idols prefer, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.