Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी परीक्षेत पुन्हा विघ्न; मुंबईत पहिल्या सत्रातील १०३ हून अधिक विद्यार्थी परीक्षेला मुकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 06:44 IST

गुरुवारी सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान पीसीएम ग्रुपची परीक्षा तर दुपारच्या सत्रातील परीक्षा २ ते ४ च्या दरम्यान होणे अपेक्षित होते.

मुंबई:  राज्यात सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू असून पीसीएम ग्रुपची परीक्षा नुकतीच संपली. विद्यार्थ्यांना अखेरच्या दिवशी  पुन्हा  तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना  सामोरे जावे लागले. परिणामी बोरिवलीतील केंद्रावर पहिल्या सत्रातील १०३ हून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षाच देता आली नाही. 

गुरुवारी सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान पीसीएम ग्रुपची परीक्षा तर दुपारच्या सत्रातील परीक्षा २ ते ४ च्या दरम्यान होणे अपेक्षित होते. मात्र बोरिवली येथील चोगले हायस्कुलच्या केंद्रावर सर्व्हर डाउनच्या तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांचे लॉगीनच होत नव्हते. अखेर सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता सोडण्यात आले.

सर्व्हर डाऊनमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य झाले नाही, अशा विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. २५ तारखेपर्यंत विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा असल्याने पुनर्परीक्षेचे नियोजन २६ ऑगस्टनंतर करण्यात येईल आणि पनर्परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना ईमेल आणि एसएमएसद्वारे कळवण्यात येईल - रवींद्र जगताप, आयुक्त सीईटी सेल 

टॅग्स :परीक्षामुंबईविद्यार्थी