Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मुंबईचे खड्डे वर्ल्ड बुकात’चं प्रमाणपत्र आयुक्तांच्या दालनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 05:40 IST

‘मुंबईचे खड्डे वर्ल्ड बुकात’ या अभियानांतर्गत वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडून मिळालेले प्रमाणपत्र, तसेच इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड, गोल्डन बुक आॅफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड या बुकांकडून मिळणारे प्रमाणपत्र महापालिका आयुक्तांच्या दालनात लावण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे.

मुंबई : ‘मुंबईचे खड्डे वर्ल्ड बुकात’ या अभियानांतर्गत वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडून मिळालेले प्रमाणपत्र, तसेच इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड, गोल्डन बुक आॅफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड या बुकांकडून मिळणारे प्रमाणपत्र महापालिका आयुक्तांच्या दालनात लावण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. यासाठी विरोधी पक्षनेते रवी राजा यांची भेट रिपाइं (ए) रोजगार आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस नवीन लादे यांनी सोमवारी घेतली. यावेळी राजा यांनी मुंबईतील खड्ड्यांची नोंद झालेले वर्ल्ड बुकचे प्रमाणपत्र आयुक्तांच्या दालनात लावले जावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :खड्डेमुंबई महानगरपालिका