Central Railway's 5 special locales for Mahaparinirvan Day | महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ विशेष लोकल
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ विशेष लोकल

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून चैत्यभूमीवर येणाºया अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण आणि कुर्ला, वाशी,पनवेल दरम्यान मध्यरात्री १२ विशेष लोकल चालविण्यात येतील. या गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.
दादरला येण्यासाठी गाड्या पुढीलप्रमाणे : कुर्ला-दादर विशेष लोकल कुर्ला येथून ००.४५ वाजता सुटेल. कल्याण-दादर विशेष लोकल कल्याणवरून १.०० वाजता सुटेल. ठाणे-दादर विशेष लोकल ठाणे येथून २.१०ला सुटेल.
दादरवरून जाण्यासाठी विशेष गाड्या : दादर-ठाणे विशेष लोकल दादरवरून १.१५ वाजता सुटेल . दादर-कल्याण विशेष लोकल दादरवरून २.२५ वाजता सुटेल. दादर-कुर्ला विशेष लोकल दादर येथून ३.०० वाजता सुटेल.
हार्बर मार्गवरील विशेष गाड्या : वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून १.३० वाजता सुटले आणि २.१० वाजता कुर्ला येथे पोहोचेल. पनवेल-कुर्ला विशेष लोकल पनवेलवरून १.४० वाजता सुटेल आणि २.४५ वाजता कुर्ला येथे पोहोचेल. वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशीवरून ३.१० वाजता सुटेल आणि ३.४० वाजता कुर्ला येथे पोहोचेल.
कुर्ला येथून सुटणाºया गाड्या : कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून २.३०ला सुटणार असून, ३.०० वाजता वाशीला पोहोचणार आहे. कुर्ला ते पनवेल विशेष लोकल कुर्ला येथून ३.०० वाजता सुटेल आणि ४ वाजता पनवेल येथे पोहोचेल, तसेच कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून ४.०० वाजता सुटेल आणि ४.३५ वाशी येथे पोहोचेल.

Web Title: Central Railway's 5 special locales for Mahaparinirvan Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.