मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 06:48 IST2025-08-16T06:47:08+5:302025-08-16T06:48:27+5:30
पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगावदरम्यान रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
मुंबई : मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर विद्याविहार ते ठाणे आणि कल्याण ते कसारा मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत रेल्वे रुळांसह सिग्नल व्यवस्थेची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. ब्लॉकमुळे २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका बसणार आहे. तर काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगावदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे.
इंटरलॉकिंगसाठी तानशेतमध्ये ब्लॉक
कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गासंबंधित तानशेत रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर १२:३० ते रविवारी पहाटे ५:१५ पर्यंत ब्लॉक असणार आहे.
दुरुस्तीदरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार गाड्या
पश्चिम रेल्वे स्थानक - बोरीवली ते गोरेगाव
मार्ग - अप आणि डाउन जलद
वेळ - सकाळी १० ते दुपारी ३
परिणाम - ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द तर, काही २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. अंधेरी, बोरीवली लोकल हार्बरमार्गे गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे स्थानक - विद्याविहार ते ठाणे
मार्ग - पाचव्या आणि सहाव्या मार्गिका
वेळ - शनिवारी मध्यरात्री १२:४० ते रविवारी पहाटे ४:४०
परिणाम - मध्य रेल्वेच्या अप आणि डाउन मेल-एक्स्प्रेस अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या १५ ते २० मिनिटे विलंबाने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.