Central Train Update भांडुप-कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 09:13 IST2018-08-08T08:52:53+5:302018-08-08T09:13:22+5:30
Central Train Update : भांडुप ते कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Central Train Update भांडुप-कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबई - बुधवारी (8 ऑगस्ट) सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या भांडुप-कांजुरमार्ग रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून धावणाऱ्या एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मध्य रेल्वे मार्गावर सकाळीच लोकलमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. ऑफिस कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना लोकल बिघाडामुळे कामावार पोहोचण्यास उशीर होणार आहे. भांडुप-कांजुरमार्ग मार्गावर हा बिघाड झाला असून रेल्वे प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असेल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.