रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 21:38 IST2025-02-07T21:37:59+5:302025-02-07T21:38:07+5:30
माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११:३० ते दुपारी ३:३० पर्यंत ब्लॉक

रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मुंबई : मध्य रेल्वेकडून रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११:३० ते दुपारी ३:३० पर्यंत हा ब्लॉक असणार आहे
ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सकाळी ११ ते दुपारी ३:१० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा स्थानकात लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. मुलुंड स्थानकातून या लोकल पुन्हा जलद मार्गावर वळवल्या जातील. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे या कालावधीत सीएसएमटी ते पनवेल आणि वांद्रे/गोरेगाव सेवा रद्द राहतील. मात्र या कालावधीत पनवेल-कुर्ला-पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. तसेच हार्बर मार्गावर प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गाच्या स्टेशनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.