नववर्ष साजरे करायला गोव्याला जायचेय? मध्य रेल्वे चालवतेय १४ विशेष सेवा; पाहा, वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 20:10 IST2023-12-15T20:07:13+5:302023-12-15T20:10:54+5:30

Central Railway Mumbai To Goa: नववर्ष स्वागतासाठी गोव्याला जायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

central railway to operate 14 special services from panvel to goa for christmas and new year welcome 2024 | नववर्ष साजरे करायला गोव्याला जायचेय? मध्य रेल्वे चालवतेय १४ विशेष सेवा; पाहा, वेळापत्रक

नववर्ष साजरे करायला गोव्याला जायचेय? मध्य रेल्वे चालवतेय १४ विशेष सेवा; पाहा, वेळापत्रक

Central Railway Mumbai To Goa: नाताळसह नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जाण्याची अनेकांची इच्छा असते. अनेक महिने याबाबतची तयारीही सुरू असते. मात्र इच्छा असतानाही अनेकांना गोव्याला जाण्यासाठी तिकिटे मिळत नाही. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढते आहे. अतिरिक्त गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेकडून पनवेल ते मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष रेल्वेसेवा चालवण्यात येणार आहेत. २२ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत यादरम्यान या सेवा चालवण्यात येणार आहेत. 

गाडी क्रमांक ०१४२७ पनवेल ते मडगाव २२ ते ३१ डिसेंबरपर्यंत (६ फेऱ्या) दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री ९.१० वाजता पनवेल येथून सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता पोहोचेल. २२ ते ३१ डिसेंबरपर्यंत (६ फेऱ्या) दर शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सकाळी ८ वाजता सुटेल आणि रात्री ८.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. या रेल्वेसेवेला रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी या स्थानकात थांबा असेल. ही रेल्वेसेवा २२ डब्यांची असून ६ वातानुकूलित तृतीय डबे, ४ शयनयान, १२ सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅन असणार आहेत.

चारही रेल्वेसेवांचे आरक्षण लवकरच सुरू होणार 

गाडी क्रमांक ०१४३० मडगाव ते पनवेल नववर्ष विशेष रेल्वेसेवा मडगाव येथून १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता (एक फेरी) सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२९ पनवेल – मडगाव नववर्ष विशेष रेल्वेसेवा पनवेल येथून २ जानेवारी रोजी सकाळी ८.२० वाजता सुटेल (एक फेरी) आणि मडगाव येथे रात्री ९.३० वाजता पोहोचेल. या रेल्वेसेवेला रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी या स्थानकात थांबा असेल. ही रेल्वे २२ डब्यांची असून ६ वातानुकूलित तृतीय डबे, ४ शयनयान, १२ सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅन असणार आहेत. या चारही सेवांचे आरक्षण लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
 

Web Title: central railway to operate 14 special services from panvel to goa for christmas and new year welcome 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.