रूळ प्रसरण पावल्याने ठप्प झालेली मध्य रेल्वेची पुण्याकडे जाणारी वाहतून तासाभराच्या खोळंब्यानंतर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 16:10 IST2018-03-27T16:10:33+5:302018-03-27T16:10:33+5:30
गेल्या एक दोन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. दरम्यान या वाढलेल्या तापमानाचा मध्य रेल्वेलाही फटका बसला असून, वाढत्या तापमानामुळे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

रूळ प्रसरण पावल्याने ठप्प झालेली मध्य रेल्वेची पुण्याकडे जाणारी वाहतून तासाभराच्या खोळंब्यानंतर सुरू
मुंबई - गेल्या एक दोन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. दरम्यान या वाढलेल्या तापमानाचा मध्य रेल्वेलाही फटका बसला असून, वाढत्या तापमानामुळे रुळ प्रसरण पावल्याने मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
वाढलेल्या तापमानामुळे अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान बेलवली फाटकाजवळ रेल्वे रूळ प्रसरण पावल्याने रुळांना तडे गेले असून, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून रुळांची दुरुस्ती करून वाहतूक दुपारी साडेतीनच्या सुमारास पूर्ववत केली.
अंबरनाथ बदलापूर दरम्यान उष्णतेने रेल्वे रूळ प्रसारण पावल्याने दुपारी २ वाजता रेल्वे सेवा झाली होती. नंतर तासभरात रेल्वे रूळ बदलून दुपारी ३.३० वाजता रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली.