Mumbai Local: मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 06:14 IST2025-04-18T06:13:35+5:302025-04-18T06:14:31+5:30

Mumbai Local Mega Block News: सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. 

Central Railway faces delays on Sunday, five-hour mega block between CSMT-Vidyavihar on 20 april 2025 | Mumbai Local: मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक

Mumbai Local: मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी ) आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी  वरून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. 

पश्चिम रेल्वेचा आज ब्लॉक

कोठून कुठपर्यंत? : वसई रोड-वैतरणा

कोणत्या मार्गावर? : जलद 

कधी? : शुक्रवारी रात्री - शनिवारी पहाटेपर्यंत 

किती वाजता? : अप फास्ट मार्गिका रात्री ११:५० ते २:५०

डाउन फास्ट मार्गिका रात्री १:३० ते पहाटे ४:३०.

मध्य रेल्वे मार्गावर...

कोठून कुठपर्यंत? :    सीएसएमटी -  विद्याविहार 

कोणत्या मार्गावर? : अप आणि डाऊन  धीम्या 

कधी? : रविवारी 

किती वाजता? : सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ 

परिणाम ? : ब्लॉक कालावधीत  मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध नसणार आहेत. 

हार्बर रेल्वे मार्गावर... 

कोठून कुठपर्यंत? :  ठाणे आणि वाशी / नेरूळ दरम्यान 

कोणत्या मार्गावर? : अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर 

कधी? : रविवारी 

किती वाजता? : सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० 

परिणाम ?: ब्लॉक कालावधीत ठाणे आणि वाशी / नेरूळ / पनवेल दरम्यान डाऊन आणि अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Web Title: Central Railway faces delays on Sunday, five-hour mega block between CSMT-Vidyavihar on 20 april 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.