लोकलनं सिग्नल तोडला, मध्य रेल्वेची वाहतूक घाटकोपरजवळ विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 15:09 IST2018-04-21T14:00:26+5:302018-04-21T15:09:50+5:30

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Central Railway is disrupted near Ghatkopar railway station | लोकलनं सिग्नल तोडला, मध्य रेल्वेची वाहतूक घाटकोपरजवळ विस्कळीत

लोकलनं सिग्नल तोडला, मध्य रेल्वेची वाहतूक घाटकोपरजवळ विस्कळीत

घाटकोपर - मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक घाटकोपरजवळ विस्कळीत झाली आहे. लोकलनं सिग्नल तोडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  

ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद लोकल सिग्नल तोडून पुढे गेली. यामुळे मोठा गोंधळ उडाला असून जलद मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली. या गोंधळामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक लोकल विद्याविहार आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान अडकून पडल्या आहेत. 

Web Title: Central Railway is disrupted near Ghatkopar railway station