The Center should also help the flood victims: Athavale | अतिवृष्टीग्रस्तांना केंद्रानेही सहाय्य करावे : आठवले

अतिवृष्टीग्रस्तांना केंद्रानेही सहाय्य करावे : आठवले

मुंबई -  राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत  तुटपुंजी असून, अतिवृष्टीग्रस्तांना भरीव 
मेदत मिळण्याची गरज आहे. केंद्र आता केंद्रीय सामाजिक न्याय  राज्यमंत्री रामदास आठवेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना  केंद्र सरकारने मदत करावी, अशी विनंती आठवले यांनी पंतप्रधानांना केली आहे.

त्या साठी आठवले  यांनी पंतप्रधानांना पत्र  पाठवले आहे. महाराषट्रातील विविध भागांत अतिवृष्टीमुळे पिकांच मोठं नुकसान झालं. शेतात पाणी, चिखल साचल्याने  पुढचा रब्बीचा हंगामही वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकरी, शेतमजूर संकटात आहे. राज्या सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत
तुटपुंजी असल्याने केंद्र सरकारने भरीव आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. असे आठवले यांनी या पत्रात म्हटले आहे.  

आठवले  यांनी नुकताच  अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री  उद्धव ठाकरेंनाही मागण्यांचे पत्र पाठवले, आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Center should also help the flood victims: Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.