Join us

एअर इंडियाकडून खासदाराच्या तक्रारीनंतर कॅटररला लगेच दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 02:22 IST

भविष्यात असे पुन्हा घडू नये व कोणालाही तक्रारीला वाव राहू नये यासाठी ही कारवाई केल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

मुंबई : विमानात सकाळच्या न्याहरीसाठी दिलेले खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे असण्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्या वंदना चव्हाण यांनी समाजमाध्यमांतून केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन एअर इंडियाने खाद्यसेवा पुरविणाऱ्या कॅटरिंग कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली आहे.खासदार वंदना चव्हाण यांनी रविवारी टिष्ट्वटरवर असे लिहिले होते की, काही दिवसांपूवी एअर इंडियाच्या सकाळी अगदी लवकरच्या पुणे- दिल्ली विमाने जात असताना न्याहरी मागविली. त्यातील आॅम्लेटमध्ये अंड्याची टरफले होती. एवढेच नव्हे तर बटाट्याचे तुकडे सडलेले होत, कडधान्य शिजलेले नव्हते व जामच्या बाटलीवर कसली तरी पावडर जमलेली होती. विमानातूनच याबद्दल अन्न सुरक्षा व प्रमाणक प्राधिकरणाकडे तक्रार केली. ती एअर इंडियात संबंधितांपर्यंत पोहोचेल की नाही, देव जाणे. पोहोचली तर कारवाई केली जाईल, अशी आशा आहे.चव्हाण यांनी असेही लिहिले होते की, निकृष्ट न्याहरीसाठी ती आणून देणारी विमानातील हवाईसुंदरी जबाबदार नाही, याची मला कल्पना आहे. पण न्याहरीतील पदार्थांबद्दल तक्रार केल्यानंतरही विमान कर्मचारी ज्या निर्विकारपणे वागले ते मला खटकले. हा विषय इथे (समाजमाध्यमांवर) लिहिणे, योग्य होईल का, असाही मनात विचार आला. पण शेवटी व्यापक जनहितासाठी हे लिहिणे गरजेचे वाटले.या संदर्भात एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी सांगितले की, खासदार चव्हाण यांनी लक्षात आणून दिलेल्या या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतली असून अन्नपदार्थ पुरविणाºया कॅटरिंग कंत्राटदारावर लगेच कारवाई केली आहे. त्यादिवशी विमानात पुरविलेल्या अन्नपदार्थांचा, ने-आण खर्चासह, सर्व खर्च तुला सोसावा लागेल, असे आम्ही त्याला कळविले आहे. भविष्यात असे पुन्हा घडू नये व कोणालाही तक्रारीला वाव राहू नये यासाठी ही कारवाई केल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.दरम्यान या घटनेनंतर एअर इंडियाच्या अन्य प्रवाशांनीही खानपान सेवेबाबत नाराजी व्यक्त करीत हा आवाज उठवल्याबद्दल चव्हाण यांचे आभार मानले आहेत.विमान कर्मचारी नामानिराळेखासदार यांचे टिष्ट्वट बारकाईने वाचले तर त्यात त्यांची निकृष्ट न्याहरीसोबतच ही गोष्ट लक्षात आणून दिल्यावरही त्याविषयी निर्विकारपणा दाखविणाºया विमान कर्मचाऱ्यांविषयीसुद्धा तक्रार होती. जेथे ग्राहकाला राजा मानले जाते अशा सेवा उद्योगात असलेल्या एअर इंडियाला आपल्या कर्मचाºयांच्या वर्तणुकीचीही अशाच तत्परतेने दखल घ्यावीशी वाटल्याचे प्रवक्त्याच्या वक्तव्यावरून दिसत नाही.

टॅग्स :एअर इंडिया