Join us  

अहवाल : प्रति हवाई प्रवाशाच्या कार्बन उत्सर्जनामध्ये ५० टक्क्यांची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 6:16 AM

आयएटीएचा अहवाल; विमान कंपन्यांनी कमी इंधन वापरासाठी प्रयत्न सुरू केल्याचा सकारात्मक परिणाम

मुंबई : सन १९९० च्या तुलनेत सध्या प्रत्येक हवाई प्रवाशामागे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामध्ये सुमारे ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)च्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. विमान कंपन्यांनी कमी इंधन वापरासाठी प्रयत्न सुरू केल्याने हा महत्त्वपूर्ण बदल घडला आहे.

विविध उपाययोजनांमुळे विमानाला लागणाºया इंधन वापराचे वार्षिक प्रमाण २.३ टक्क्यांनी घटविण्यात विमान कंपन्यांना यश आले आहे. विमान कंपन्यांनी अत्याधुनिक व कमी इंधन वापर असणाºया विमानांच्या खरेदीला प्राधान्य दिल्याने व आॅपरेशनल उपाययोजनांमुळे हा बदल घडला आहे. प्रत्येक प्रवाशामागे होणाºया कार्बन उत्सर्जनामध्ये ५० टक्क्यांची घट होणे हा विमान वाहतूक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. आयएटीए जगभरातील सुमारे २९० विमान कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते व जगातील सुमारे ८२ टक्के प्रवासी या २९० विमान कंपन्यांच्या विमानांद्वारे प्रवास करतात. प्रति प्रवासी होणाºया कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण यापेक्षा अधिक घटावे अशी आमची अपेक्षा असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आयएटीएचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांड्रे डे ज्युनियॅक यांनी दिली. नवीन तंत्रज्ञानाचा वापर, इंधनातील बदल व आॅपरेशनल सुधारणांमधील सातत्य याद्वारे हे ध्येय गाठता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.विमान कंपन्यांनी अत्याधुनिक विमानांच्या खरेदीसाठी सन २००९ पासून सुमारे १ ट्रिलीयन डॉलर्स गुंतविले आहेत. पर्यावरणपूरक इंधनासाठी कंपन्यांनी ६ अब्ज डॉलर्सचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.हवाई प्रवासात होणाºया कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करून पर्यावरणपूरक हवाई सेवा पुरविण्यासाठी जगभरातील हवाई कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले असून या प्रयत्नांना निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयएटीएने व्यक्त केला आहे.

टॅग्स :विमानप्रवासीपर्यावरण