भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:32 IST2025-07-30T14:28:49+5:302025-07-30T14:32:38+5:30

अंधेरी लोखंडवाला येथील मार्केट परिसरात एका कार चालकानं भर रस्त्यात कार पार्क केल्यानं वाहतूककोंडी झाल्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

car with dog on drivers seat causes traffic jam in Mumbai Lokhandwala viral video sparks debate Gaadi aaj tera bhai chalayega | भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...

भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...

मुंबई

अंधेरी लोखंडवाला येथील मार्केट परिसरात एका कार चालकानं भर रस्त्यात कार पार्क केल्यानं वाहतूककोंडी झाल्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब अशी की या कार चालकानं स्टेअरिंगवर त्याच्या पाळीव कुत्र्याला बसवलं होतं. 

अंधेरी पश्चिमेला लोखंडवाला परिसरातील मुख्य बाजारातील रस्ता एका कार चालकाच्या चुकीच्या पार्किंगमुळे रोखला गेला होता. लाल रंगाची एक कार रस्त्याच्या अगदी मधोमध उभी असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येतं. कारच्या मागे बेस्टची बस अडकून पडली आहे. तर त्यामागेही बऱ्याच गाड्या थांबून आहेत. भर रस्त्यात पार्क करण्यात आलेल्या या कारच्या ड्रायव्हर सीटवर चक्क एक पाळीव कुत्रा बसवण्यात आल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. 


संबंधित कार मालकाची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या व्हायरल व्हिडिओवर यूझर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कुणी कार चालकावर कडक कारवाईची मागणी केलीय तर कुणी "आज गाडी तेरा भाई चलाएगा" म्हणत घडलेल्या प्रकाराची खिल्ली उडवली आहे. मोठा अपघात घडून काहीतरी भयानक घडू शकतं अशा धोकादायक ठिकाणी प्राण्याला बसवून मूर्खपणा करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी एका यूझरनं केली आहे.

Web Title: car with dog on drivers seat causes traffic jam in Mumbai Lokhandwala viral video sparks debate Gaadi aaj tera bhai chalayega

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.