प्रभादेवीत सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला पडले भगदाड, कार अडकली; कामावर प्रश्नचिन्ह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 13:50 IST2024-09-12T13:47:09+5:302024-09-12T13:50:12+5:30
मुंबईत प्रभादेवी येथे सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला आज सकाळी भगदाड पडलं.

प्रभादेवीत सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला पडले भगदाड, कार अडकली; कामावर प्रश्नचिन्ह!
मुंबईतप्रभादेवी येथे सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला आज सकाळी भगदाड पडलं. यात एका कार अडकली होती. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही. स्थानिकांच्या मदतीनं कार खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली. मनपाचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले असून आता जेसीबीच्या मदतीने खचलेल्या रस्त्याचं डेब्रीज काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
भर रस्त्यात पडलेल्या भगदाडामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारच्या जागी जर एखादा दुचाकीस्वार असता तर दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली असती इतका मोठा खड्डा रस्त्यात पडला आहे. ही घटना म्हणजे निकृष्ट दर्जाचं उदाहरण असल्याचं म्हटलं जात आहे