मुंबई: ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबले; कारच्या धडकेत ५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 19:55 IST2018-06-21T19:48:00+5:302018-06-21T19:55:22+5:30
चौकशीत ही गाडी ध्रुवीच्या मालकीची नसून तिने भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली.

मुंबई: ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबले; कारच्या धडकेत ५ जखमी
मुंबई: धारावीत गुरुवारी एका भरधाव कारने काही जणांना उडवल्याची दुर्घटना घडली. या अपघातात ५ जण जखमी झाले असून या जखमींमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे.
ध्रुवी जैन या तरूणीचा कारवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. तिच्यासोबत तिच्या तीन मैत्रिणींही कारमध्ये होत्या. या सर्व जणीं वांद्रे येथे जात होत्या. धारावीत सिग्नल लागल्याने कारवर ताबा मिळवण्यासाठी ध्रुवी जैन ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटर दाबले. त्यामुळे तिचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर तिची कार दुसऱ्या गाडीवर जाऊन आदळली. यामध्ये पाच जण जखमी झाले.
या घटनेनंतर पोलिसांनी ध्रुवीला ताब्यात घेतले होते. त्यावेळी केलेल्या चौकशीत ही गाडी ध्रुवीच्या मालकीची नसून तिने भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली. ध्रुवीने पोलिसांसमोर आपली चूक मान्य केली. अपघातानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली परंतु, तिनं कोणतेही मद्यपान केले नाही हे सिद्ध झाल्याने तिला जामीन मिळाला आहे.