अंधेरीतून एक कोटींची ब्राऊन शुगर हस्तगत; अंबोली पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 14:07 IST2017-09-11T14:03:55+5:302017-09-11T14:07:22+5:30
अंधेरीतील वीरा देसाई आणि अंधेरी लिंक रोड भागातून एक कोटी रुपयांचे ब्राऊन शुगर हस्तगत करण्यात आली आहे.

अंधेरीतून एक कोटींची ब्राऊन शुगर हस्तगत; अंबोली पोलिसांची कारवाई
मुंबई, दि.11- अंधेरीतील वीरा देसाई आणि अंधेरी लिंक रोड भागातून एक कोटी रुपयांचे ब्राऊन शुगर हस्तगत करण्यात आली आहे. अंबोली पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली आहे. नुकतीच मेफेड्रोन या अंमली पदार्थाची फॅक्टरी उध्वस्थ केल्यानंतर पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ब्राऊनशुगर सापडली आहे.
पोलीस उपयुक्त देहिया, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकाने एक कोटींची ब्राऊन शुगर ताब्यात घेतली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या एक किलो ब्राऊन शुगरची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतील किंमत एक कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सुत्रांनी सांगितले. जितेश राठोर (२३) आणि नटवर सिंह भाटी ऊर्फ विजय (२७).या दोघांना अटक करण्यात आली आहे.