Join us  

Cannes 2022 : कान्स चित्रपट महोत्सवात अमृता फडणवीस, विमानतळावर लँडिंग होताच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 5:40 PM

आंतरराष्ट्रीय स्तरावर कान्स चित्रपट महोत्सवाला एक विशिष्ठ स्थान आहे

मुंबई - सिनेक्षेत्रात सध्या उत्सुकता आणि चर्चा आहे ती म्हणजे कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हची. कान्स चित्रपट महोत्सवात भारतातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. बॉलिवूड अभिनेत्यांपासून ते राजकीय नेते आणि मंत्र्यांपर्यंत अनेकांनी या महोत्सवात उपस्थिती दर्शवली आहे. 18 मे पासून सुरु झालेला हा चित्रपट महोत्सव येत्या 28 मे पर्यंत असणार आहे. त्यामुळे आपल्या वेळेनुसार दिग्गज या महोत्सवाला भेट देत आहेत. आता, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनीही कान्स महोत्सवासाठी लँडींग केले आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर कान्स चित्रपट महोत्सवाला एक विशिष्ठ स्थान आहे. यंदा 75 वा कान्स चित्रपट महोत्सव मोठ्या दणक्यात साजरा होत आहे. कोविडमुळे दोन वर्षानंतर या चित्रपट महोत्सावाल जगभरातून सिनेक्षेत्रातील दिग्गज हजर आहेत. भारतातूनही दिपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा, सोनम कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी कान्स सोहळ्याला पोहोचले आहेत. हॉलिवूडच्या कलाकारांनीही या सोहळ्यात एन्ट्री केली आहे. आता, अमृता फडणवीस याही कान्स फेस्टीव्हलला पोहोचल्या आहेत. विमानतळावर लँड होताच हातात बॅग घेतलेले छायाचित्र त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहे. 

कान्समध्ये पोहोचले... असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यासोबतच, कान्स चित्रपट महोत्सव २०२२, बेटर वर्ल्ड असे हॅशटॅगही अमृता फडणवीस यांनी लिहिले आहेत. या फोटोत त्या एकट्यात दिसून येतात, त्यामुळे त्यांच्यासमेवत कोण कोण या सोहळ्याला आहे, हे अनुत्तरीत आहे. मात्र, अमृता फडणवीस यांच्या या फोटोवरुन सध्या सोशल मीडियावर कमेंट येत आहेत.  

अमित देशमुखही शिष्टमंडळ घेऊन पोहोचले

मराठी आणि हिंदी चित्रपटांना कान्स फिल्म फेस्टिवल मधील फिल्म मार्केट हे चांगले माध्यम आहे आणि यात सहभागी होण्याची संधी मराठी त्याचप्रमाणे हिंदी चित्रपट निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना यानिमित्ताने उपलब्ध होत आहे. तर, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राशी आवड असणारे नेतेमंडळीही या महोत्सवात हजर राहत आहे. फ्रान्समधील कान्स येथे सुरू असलेल्या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ कान्स येथे पोहोचले आहे. 

6 भारतीय तर 4 मराठी चित्रपटांना मिळालं स्थान 

कान्स चित्रपट महोत्सवामध्ये 6 भारतीय चित्रपटांना मानाचं स्थान मिळालं आहे. या सहा चित्रपटांमध्ये 4 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari), ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona), ‘गोदावरी’ (Godavari) या चित्रपटांनी कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मानाचं स्थान मिळवलं आहे. 

टॅग्स :अमृता फडणवीसकान्स फिल्म फेस्टिवलमुंबई