Join us  

ऑडिशनला बोलावून मॉडल्सकडून ब्लू फिल्म शूट करुन घेतल्या; मुंबईतील धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 9:25 PM

मॉडेल आर्थिक चणचणीतून जात असल्याने तिच्याकडून ब्लू फिल्म तयार करून घेण्यात आल्या.

मुंबई: कोरोनामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात सामान्य नागरिकांसह मनोरंजन क्षेत्रात आणि बॉलीवूडलाही कोरोनामुळे आर्थिक चणचण सोसावी लागत आहे. मात्र याचा फायदा घेत मुंबईतील एका मॉडेल्सकडून ब्लू-फिल्म शूट करुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मॉडेल आर्थिक चणचणीतून जात असल्याने तिच्याकडून ब्लू फिल्म तयार करून घेण्यात आल्या. ऑडिशनसाठी बोलावून काही लोक मॉडेल्सना अश्लील कृत्य शूट करायला सांगत होते. याला मॉडल्सनी नकार दिल्यानंतर सेटचा आणि सर्व शुटिंगचा खर्च देण्याची जबरदस्ती केली जात होती. मात्र तरीही नकार दिल्यास पोलिसात तक्रार करू, अशी धमकी देऊन मॉडेल्सकडून ब्लू फिल्म शूट करुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. 

मुंबईत याआधी देखील २६ वर्षीय तरुणाचे विवस्त्र चित्रीकरण समाज माध्यमांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन बिटकॉईनमध्ये खंडणी मागण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. कुर्ला परिसरात राहणारा २६ वर्षीय पीडित तरुणाला मॉडेलिंग समन्वयक म्हणून काम करतो. परदेशातील एका नामांकित मॉडेलिंगच्या कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून ठगाने पीडित तरुणासोबत इन्स्टाग्रामवर ओळख करून घेतली व नंतर संपर्क वाढवला. त्याच ओळखीतून परदेशात मॉडेलिंगची संधी देण्याचे स्वप्न दाखवले. नंतर १७ जुलैला त्याच्या मोबाईलवर आयएमओ ॲपवरून त्याला कॉल आला. समोरच्या व्यक्तीने मॉडेलिंग करता का, याबाबत विचारणा केली. 

पीडित तरुणाने होकार देताच शर्ट काढून शरीर दाखवण्यास सांगितले. सलमानने तसे केल्यानंतर आरोपीने त्याला पॅंटही काढण्यास सांगितली. मॉडेलिंग काँट्रॅक्‍ट मिळेल या आशेने त्याने तेही केले. तो पूर्णपणे नग्न झाल्यानंतर आरोपीने त्याचे नकळत चित्रीकरण केले व त्याचा दूरध्वनी क्रमांक घेतला. पुन्हा दूरध्वनी करण्याचे आश्‍वासन दिले. ठरल्यानुसार त्याने पुन्हा कॉल केला. त्यावेळी आरोपीने पीडित तरुणाला त्याच्या नावाचे बनावट इन्स्टाग्रामवर खाते उघडले असून त्यात विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी बिटकॉइनद्वारे डॉलर्समध्ये खंडणीची मागणी केली. पीडित तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने त्याची चित्रफीत व्हायरल केली होती.

धोका टाळण्‍यासाठी काय कराल?

सोशल मीडियावर छायाचित्र अपलोड करू नका.वैयक्तिक माहिती सांगू नका.सर्व शेअर करायची सवय असते. शक्‍यतो ते टाळा.प्रियजनांशी चॅटिंग, व्हिडीओ कॉल करताना सर्वच खासगी बाबी शेअर करू नका.

टॅग्स :लैंगिक छळलैंगिक शोषणपोलिसमुंबई