येऊरमध्ये सापडलेल्या बछड्याचे वजन १ किलो ४० ग्रॅमने वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 02:01 AM2019-12-23T02:01:58+5:302019-12-23T02:02:12+5:30

वनविभागाने घेतली काळजी : खेळणी व मातीत फेरफटक्यासाठी केली व्यवस्था

The calf found in Asur increased by 5 kg to 5 grams | येऊरमध्ये सापडलेल्या बछड्याचे वजन १ किलो ४० ग्रॅमने वाढले

येऊरमध्ये सापडलेल्या बछड्याचे वजन १ किलो ४० ग्रॅमने वाढले

Next

मुंबई : येऊरच्या जंगलात ४ डिसेंबर रोजी बेवारसपणे बिबट्याचा बछडा आढळून आला. या बछड्याला त्याच्या आईची भेट घडवून आणण्यासाठी तीनदा प्रयत्न केला गेला. परंतु तीनही प्रयोग अपयशी ठरले. त्यामुळे बछड्याची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एका विश्रामगृहात विशेष व्यवस्था करण्यात आली असून, त्याला चोवीस तास देखरेखीखाली ठेवले जाते. आता बछड्याची प्रकृती ठणठणीत असून त्याचे वजन १ किलो ४० ग्रॅमपर्यंत वाढले आहे. तसेच त्याला शारीरिक व्यायामासाठी व मातीमध्ये फेरफटका मारण्यासाठी सोडले जाते.

व्याघ्र व सिंह विहाराचे वनपरीक्षेत्र अधिकारी (अधीक्षक) विजय बारब्दे म्हणाले, बछडा सापडला तेव्हा त्याचे वजन ३८० ग्रॅम होते. आज त्याचे वजन १ किलो ४० ग्रॅम झाले आहे. आतापर्यंत त्याला कोणताही संसर्ग झालेला नाही. त्यामुळे बछड्यासाठी काही खेळणी आणण्यात आली असून, त्यातून त्याचा शारीरिक व्यायाम सुरू आहे. दरम्यान, त्याच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. त्याचबरोबर त्याला मातीची सवय व्हावी, यासाठी त्याला मातीमध्ये फेरफटका मारण्यासाठी सोडले जाते. आठ लोकांची टीम त्याची निगा राखत असून, सध्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांच्यासह एक पथक एका दुसऱ्या कामासाठी नागपूरमध्ये गेले आहे. त्यामुळे त्या बछड्याची काळजी व वैद्यकीय तपासणी डॉ. मनीष पिंगळे करत आहेत.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष पिंगळे म्हणाले की, बछड्यावर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी काही माणसांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच बछड्याला दिवसातून सात वेळा दूध पाजले जाते.
 

Web Title: The calf found in Asur increased by 5 kg to 5 grams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.