Join us

1 फेब्रुवारीपासून 'ब्लॅकआऊट'? शिवसेनेच्या केबलचालक संघटनेचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 17:03 IST

सर्व कंपन्यांनी त्यांचे चॅनल निवडून वेगवेगळे असे 25 ते 30 बुके बनविले आहेत. यामुळे ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे.

मुंबई : ट्रायने लोकांना जेवढे पसंतीचे चॅनल पाहता तेवढेच पैसे मोजण्याची योजना आणली पण ही टेरिफ आर्डर कोणाच्या हिताची आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील 1 फेब्रुवारीपासून टीव्ही बंद झाल्यास केबलचालकांचा संबंध नाही, असा इशारा शिवसेनेच्या केबल चालकांच्या संघटनेचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे. 

लोकांना स्वतःचं चैनल निवडण्याचा अधिकार आहे ही सरकारची भूमिका आम्हाला योग्य वाटली होती, म्हणून आम्ही सहकार्य केले. परंतू, नंतर या योजनेतल्या त्रुटी समोर आल्या आहेत. आम्ही 200 रुपयांपासून 200 ते 350 चॅनेल दाखवत होतो. मात्र, ट्रायने तेव्हा छोटे बुके विकण्यास मनाई केली आता तेच पुन्हा छोटे छोटे बुके बनावण्यास सांगत आहेत. नव्या नियमानुसार या चॅनलची रक्कम मोजल्यास ती 450 रुपयांपेक्षा अधिक मोजावी लागणार आहे. आधी याच चॅनलसाठी आम्ही 300 रुपये आकारत होतो. रोज किंमती बदलत असल्याने ग्राहकांना कसे तोंड द्यायचे, असा आरोपही त्यांनी उपस्थित केला. 

Exclusive : 'ट्राय'कडून 154 रुपयांत 'गाजर'; आवडीच्या चॅनलची पॅकेज पाहून डोळे गरगरतील!

  सर्व कंपन्यांनी त्यांचे चॅनल निवडून वेगवेगळे असे 25 ते 30 बुके बनविले आहेत. यामुळे ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. नव्या टेरिफ आदेशावर सहमती घेतल्याशिवाय लागू करणाऱ नसल्याचे ट्रायने सांगितले होते. मात्र, ग्राहकांकडून भरून घ्यायचे अर्ज अद्याप आमच्याकडे आलेले नाहीत. 1 फेब्रुवारीपासून नवे नियम लागू करणार आहेत. यामुळे चॅनलचा बुके न विकता केबलचालक एक एक चॅनल ग्राहकांना विकतील आणि त्यानुसारच पैसे आकारतील, असेही त्यांनी सांगितले. 

सरकारने आडमुठेपणा न करता, तीन महिन्यांची मुदतवाढ करावी अशी मागणी परब यांनी करत ट्रायसोबतची चर्चा निष्फळ झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

पसंतीचे चॅनेल पाहण्यासाठी किती पैसे लागणार? TRAI चे चॅनल सिलेक्टर अ‍ॅप्लिकेशन आले

टॅग्स :डीटीएचटेलिव्हिजन