निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीचा प्रलंबित निर्णय कॅबिनेटच्या दारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 06:30 AM2019-09-15T06:30:16+5:302019-09-15T06:30:21+5:30

निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कल्याणी डोंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली.

Cabinet reshuffle pending decision on extension of resident doctor's salary | निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीचा प्रलंबित निर्णय कॅबिनेटच्या दारी

निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीचा प्रलंबित निर्णय कॅबिनेटच्या दारी

Next

मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित विद्यावेतन वाढीसाठी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कल्याणी डोंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून विद्यावेतन वाढीला हिरवा कंदील मिळाला असल्याची माहिती डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली. आता याविषयीचा अंतिम निर्णय निवडणुकीपूर्वी कॅबिनेटमध्ये घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विद्यावेतनाच्या प्रश्नासंदर्भात निवासी डॉक्टरांनी यापूवीर्ही वारंवार आंदोलन केले आहे. मात्र, या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही, केवळ आश्वासने देण्यात येतात, काही महिन्यांनी विद्यावेतनाचा प्रश्न पुन्हा प्रलंबित राहतो. केंद्र सरकारच्या निवासी डॉक्टरांना जितके विद्यावेतन मिळते, तितके ते राज्यातील निवासी डॉक्टरांनाही मिळायला हवे, अशी मागणी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने केली
आहे. त्यामुळे आता निवडणुकांच्या घोषणेपूर्वी विद्यावेतन वाढीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब व्हावा ही इच्छा आहे, असे मार्ड अध्यक्षा
डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले.

Web Title: Cabinet reshuffle pending decision on extension of resident doctor's salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.