न्यू इंडिया बँकेला ‘ए’ ग्रेड देणाऱ्या सीएचीही चौकशी; अन्य ऑडिटरनाही समन्स बजावण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 05:37 IST2025-02-21T05:37:40+5:302025-02-21T05:37:56+5:30
संजय राणे अँड असोसिएटस’चे देशमुख यांनीच न्यू इंडिया बँकेचे २०१९ ते २०२१ या दोन आर्थिक वर्षांचे ऑडिट केले होते. २०१९ पासून बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताने गैरव्यवहार सुरू केला होता.

न्यू इंडिया बँकेला ‘ए’ ग्रेड देणाऱ्या सीएचीही चौकशी; अन्य ऑडिटरनाही समन्स बजावण्यात येणार
मुंबई : न्यू इंडिया को-ऑप. बँकेला दोन आर्थिक वर्षांत ऑडिटसाठी ‘ए’ ग्रेड देणारे सीए अभिजित देशमुख गुरुवारी चौकशीला हजर झाले. त्यांनी बँकेला ‘ए’ ग्रेड ऑडिट रिपोर्ट कोणत्या आधारावर दिला याची चौकशी करण्यात आली.
‘संजय राणे अँड असोसिएटस’चे देशमुख यांनीच न्यू इंडिया बँकेचे २०१९ ते २०२१ या दोन आर्थिक वर्षांचे ऑडिट केले होते. २०१९ पासून बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताने गैरव्यवहार सुरू केला होता. त्यामुळे संशयाच्या घेण्यात अडकलेल्या देशमुख यांची चौकशी करून जबाब नोंदविण्यात आला आहे.
इतरांनाही समन्स
अन्य ऑडिटरनाही समन्स बजावण्यात येणार आहेत. बँकेने सादर केलेल्या कागदपत्रांचा तपास सुरू आहे. तसेच माजी सीएओ अभिमन्यू भोअन यांच्याकडेही सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.