गोविंदवाडी बायपास लवकरच

By Admin | Updated: December 31, 2014 22:39 IST2014-12-31T22:39:48+5:302014-12-31T22:39:48+5:30

गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला गोविंदवाडी बायपास रस्त्याची पाहणी सार्वजनिक उपक्र म व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संबधित अधिकारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थित केली

Bypassing Govindwadi soon | गोविंदवाडी बायपास लवकरच

गोविंदवाडी बायपास लवकरच

कल्याण - गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला गोविंदवाडी बायपास रस्त्याची पाहणी सार्वजनिक उपक्र म व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संबधित अधिकारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थित केली खासदार डॉ श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, महापौर कल्याणी पाटील, शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, आयुक्त रामनाथ सोनावणे आदीसह पालिका पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण मधील किल्ल्ये दुर्गाडी गोविंदवाडी बायपास रस्ता गेल्या अनेक वर्षापसून रखडला असून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा व शहरातील वाहतुक कोंडी दूर व्हावी म्हणून शहरवासीयांनी नविनर्वाचित पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले असता पालकमंत्र्यांनी आज कल्याण शहरात येवून या रस्त्याची पाहणी केली प्रथम किल्ल्ये दुर्गाडी परिसरात शिवसेना कल्याण शहर शाखेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, गोविंदवाडी बायपास रस्ता ज्या तबेल्याजवळ रखडला आहे त्या ठिकाणी पाहणी केली व पालिका आयुक्त सोनावणे यांनी याबाबतची संपूर्ण माहिती व आराखडा पालकमंत्र्यांना समजून सांगितला तर स्थानिक नागरिकांनी गाऱ्हाणी मांडली यात असलम कर्ते यांनी पालिका जी जागा देत आहे ती गैरसोयीची असल्याची अनेकांनी शिंदे यांना सांगितले याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कि नुकताच मंत्री पदाचा पदभार स्वीकारला असून या रस्त्या बाबत राज्यसरकार गंभीर आहे . हा रस्ता न्याय प्रविष्ठ असून येत्या आठ तारखेला हा रस्ता किती महत्वाचा आहे हि भूमिका प्रशासन न्यायालयात मांडेल. हा रस्ता झाल्यास वाहतूककोंडी, अपघात तळतील असा आशावाद पालक मंत्र्यांनी व्यक्त केला व यासाठी प्राधानाण्याने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, सुभाष भोईर, गटनेता रवी पाटील, सभापती दिपेश म्हात्रे, नगरसेवक बाल हरदास , प्रभुनाथ भोईर, प्रकाश पेणकर, रमेश जाधव, दीपक भोईर बजरंग भोईर प्रांत अधिकारी धनंजय सावळकर, तहसीलदार किरण सुरवसे आदीसह पालिका पदाधिकारी अधिकारी शिवसैनिक व नागरिक मोठ्यासंखेने उपस्थित होते
(वार्ताहर)

 

Web Title: Bypassing Govindwadi soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.