लोकलच्या डब्यात साहित्य खरेदी करताय; विक्रेत्याचे अधिकृत ओळखपत्र तपासले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 11:20 IST2026-03-02T11:19:53+5:302026-03-02T11:20:29+5:30

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आता परवानाधारक विक्रेते (लायसन्सी वेंडर) फिरणार आहेत.

Buying materials in a local train compartment did you check the seller's official ID card | लोकलच्या डब्यात साहित्य खरेदी करताय; विक्रेत्याचे अधिकृत ओळखपत्र तपासले का?

लोकलच्या डब्यात साहित्य खरेदी करताय; विक्रेत्याचे अधिकृत ओळखपत्र तपासले का?

महेश कोले

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आता परवानाधारक विक्रेते (लायसन्सी वेंडर) फिरणार आहेत. प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये खाद्यपदार्थांव्यतिरिक्त (नॉन-कॅटरिंग) वस्तू विक्रीस परवानगी दिली आहे. यासाठी ५० जणांना अधिकृत वेंडिंगची परवानगी दिली आहे.

लोकलमधील वाढती गर्दी लक्षात घेऊन कार्यालयीन वेळांत बदल करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाने यापूर्वी संस्थांना केली होती. अशा परिस्थितीत लोकलमध्ये विक्रीला परवानगी देणे म्हणजे गर्दीत अधिक भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी २०२३-२४ मध्येही लोकलमध्ये विक्रेते नेमण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता; मात्र खासगी कंत्राटदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तो पुढे ढकलण्यात आला होता. आता पुन्हा या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने प्रवासी संघटनांकडून तीव्र विरोध व्यक्त केला जात आहे.

काय विक्री करण्यास परवानगी?
१. हे विक्रेते लोकलमध्ये नेकलेस, कृत्रिम दागिने, क्लिप, हेअर बँड, कानातले आदी वस्तू विकताना दिसतील. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार हे विक्रेते केवळ गर्दी नसलेल्या (नॉन-पीक) वेळेतच विक्री करतील. त्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होणार नाही.

२. तसेच अधिकृत परवानगी दिल्यामुळे बेकायदा विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षा दृष्टीने नोंदी ठेवणे सोपे होईल, असेही त्यांचे म्हणणे आहे. भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये युनिफॉर्म व ओळखपत्रधारक कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. आयआरसीटीसीकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, दि. ३१ जानेवारीपासून २३ दिवसांत २०३ बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

प्रवासी संघटनांचे म्हणणे काय?
दागिन्यांच्या टोकदार वस्तूंमुळे विशेषतः महिला डब्यात प्रवाशांना दुखापत होण्याची शक्यता असते. मुंबई रेल प्रवासी संघाच्या सदस्या लता अरगडे यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवित तो मागे घेण्याची मागणी केली आहे.

Web Title : लोकल में खरीदारी? विक्रेता का पहचान पत्र जांचें!

Web Summary : मुंबई लोकल में अब गैर-खानपान वस्तुएं बेचने वाले लाइसेंसधारी विक्रेता। सीएसएमटी-पनवेल मार्ग पर 50 विक्रेताओं को अनुमति, भीड़भाड़ की चिंता। पहले विलंबित, आभूषणों से चोट लगने के डर से यात्री संघों का विरोध।

Web Title : Buy goods on local trains? Check vendor ID!

Web Summary : Mumbai locals now permit licensed vendors selling non-catering items. 50 vendors authorized on CSMT-Panvel route, sparking concerns about overcrowding. Previously delayed, the initiative faces opposition from passenger associations fearing injuries from jewelry items, especially in women's compartments.