बसमध्ये तरुणीची छेड काढणारा अटकेत

By Admin | Updated: April 23, 2016 02:24 IST2016-04-23T02:24:13+5:302016-04-23T02:24:13+5:30

चालत्या बसमध्ये तरुणीची छेड काढणाऱ्या एका रोडरोमिओला गुरुवारी रात्री पवई पोलिसांनी अटक केली. अशोक नळवे (४८) असे या आरोपीचे नाव असून, तो दिवा येथील राहणारा आहे.

The bus driver stays in the bus | बसमध्ये तरुणीची छेड काढणारा अटकेत

बसमध्ये तरुणीची छेड काढणारा अटकेत

मुंबई : चालत्या बसमध्ये तरुणीची छेड काढणाऱ्या एका रोडरोमिओला गुरुवारी रात्री पवई पोलिसांनी अटक केली. अशोक नळवे (४८) असे या आरोपीचे नाव असून, तो दिवा येथील राहणारा आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे तक्रार घेण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणीदेखील हद्दीचा वाद दाखवल्याने तरुणीला बराच वेळ ताटकळत राहावे लागले.
पीडित तरुणी दक्षिण मुंबई परिसरात राहणारी असून, ती गोरेगाव येथे शिकण्यासाठी जाते. गुरुवारी सायंकाळी ती बसने पवईच्या दिशेने येत होती. बसमध्ये तिच्या पाठच्या सिटवर आरोपी बसला होता. काही वेळानंतर आरोपीने सिटच्या गॅपमधून हात घालत या मुलीची छेड काढली. ही बाब तिच्या लक्षात येताच तिने तत्काळ आरडाओरडा केला. त्यानंतर बस चालकाने ही बस भांडुप पोलीस ठाण्यात नेली.
या ठिकाणी प्रवाशांनी या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र गुन्हा पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेला असल्याने तत्काळ पीडित तरुणीला आणि आरोपीला पवई पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत या आरोपीला अटक केली.
गेल्या काही वर्षांत महिलांवर झालेल्या अत्याचारानंतर पोलिसांनी हद्दीचा वाद न घालता तत्काळ गुन्हा दाखल करावा असे आदेश आहेत. मात्र असे असताना भांडुप पोलिसांनी या तरुणीची तक्रार दाखल करून न घेता तिला पवई पोलीस ठाण्यात पाठवले.
त्यामुळे तरुणीला मोठा त्रास झाल्याने तिने हा सर्व प्रकार सोशल मीडियावर वायरल केला. (प्रतिनिधी)

Web Title: The bus driver stays in the bus